छत्रपति श्रीशिवाजी महाराजांची आरती
- जयदेव जयदेव जय जय शिवराया
या या अनन्यशरणा आर्यां ताराया ।।ध्रु।।
- आर्यांच्या देशावरि म्लेंच्छांचा घाला
आला आला सावध हो शिवभूपाला !
सद्गदिता भुमाता दे तुज हांकेला
करूणारव भेदुनि तव हृदय न कां गेला ?।।१।।
- श्रीजगदंबा जीस्तव शुंभादिक भक्षी
दशमुख मर्दुनि जी श्रीरघुवर संरक्षी
ती पूता भुमाता म्लेंच्छांहीं छळता
तुजविण तिज शिवराया कोण दुजा त्राता ?।।२।।
- त्रस्त आम्ही दीन आम्ही शरण तुला आलों
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालों
साधु परित्राणाया दुष्कृती नाशाया
भगवन् भगवद्गीता सार्थ कराया या ।।३।।
- ऐकुनियां आर्यांचा धावा महिवरला
करूणोक्तें स्वर्गीं श्रीशिवनृप गहिंवरला
देशास्तव शिवनेरीं घेई देहाला
देशास्तव रायगडीं ठेवी देहाला ।।४।।
- ।। बोला तत्श्रीमत्षिवनृप की जय बोला ।।
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
(सन १९०२ रोजी, फर्ग्युसन कॉलेजातील आर्यन संघात दर आठवड्याला
सर्व विद्यार्थ्यांनी भोजनसंघात म्हणण्यासाठी हि आरती सावरकरांनी रचली)
🏰 श्री शिवप्रतिष्ठान, हिन्दुस्थान 🏰
🚩 गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी
।। जय भवानी जय शिवराय ।।
📞 Share | Forward | Follow 👇